आई -वडील हे मुलांच्या स्वप्नाचे प्रवेशद्वार : भरत रसाळे
schedule14 Apr 25 person by visibility 150 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : " एकविसावे शतक हे ज्ञानयुग आहे. या युगामध्ये मुले हीच पालकांची संपत्ती आहे. आई वडील हे मुलांच्या स्वप्नांचे प्रवेशद्वार आहेत. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांची स्वप्नं फुलवण्यासाठी योगदान द्यावे. अभ्यासाबरोबरच मुलांच्या आहाराकडेही लक्ष असू दे"असे आवाहन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले.
समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.समृद्धी प्रकाशनच्या संचालिका वैशाली आगम, पतसंस्थेचे माजी चेअरमन सूर्यकांत बर्गे, संचालक साताप्पा कासार ,दशरथ कांबळे, समितीचे शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे ,महिला शहराध्यक्ष चारुलता पाटील, शोभा शिंत्रे व सारिका पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोल्हापुरातील अंबिका हॉल येथे हा कार्यक्रम झाला .
समृद्धी शैक्षणिक प्रसारक संस्था पाचवडेतर्फे आयोजित समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी इयत्ता पहिली ते चौथीतील सात हजार मुलांची परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी साताप्पा कासार यानी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेचे प्रमुख आनंद आगम यांनी केले राहुल कदम यांनी सूत्रसंचालन केले. अमर आगम यांनी आभार मानले.