शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी गुणवंत प्राचार्य- शिक्षक-कर्मचाऱ्यांचा पुरस्कारांनी सन्मान
schedule18 Nov 24 person by visibility 52 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापनदिनी गुणवंत प्राचार्य, शिक्षक व सेवकांना सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या विविध विभागातील व कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील कॉलेजमधील प्राचार्य, शिक्षक व सेवकांचा समावेश आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी सुहासिनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक म्हणून इतिहास विभागातील प्रा. डॉ. अवनिश रामकृष्ण पाटील यांना सन्मानित केले. विद्यापीठातील गुणवंत प्रशासकीय सेवक म्हणून सहायक कुलसचिव प्रल्हाद बाबूराव जाखले ( परीक्षा विभाग), पीजी बिल्स विभागातील अधीक्षक सुनिल जयवंत देसाई, अभियांत्रिकी विभागातील मेस्त्री गणपती बाळाप्पा मस्ती, महाविद्यालये व व विद्यापीठ विकास विभागातील तात्यासो निवृत्ती करपे यांचा समावेश आहे.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्न कॉलेजमधील गुणवंत प्राचार्य म्हणून डॉ. शिवलिंग गंगाधर मेनकुदळे ( सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा), संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक म्हणून प्रा.डॉ. राजेश काशीनाथ निमट ( बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण), महाविद्यालयीन गुणवंत सेवक म्हणून धनाजी शिवाजी पाटील (मुख्य लिपिक, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आष्टा), मोहन बाळासाहेब माने (ग्रंथालय परिचर, लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स सातारा), कै. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार हा डॉ. पोपट महादेव पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस) यांना प्रदान केला. कै. प्राचार्या सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार हा डॉ. अंजली राजेंद्र पाटील (राजाराम कॉलेज, कोल्हापूर) यांना मिळाला.