मनसेतर्फे गुरुवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप
schedule11 Jun 25 person by visibility 51 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, ‘एक हात मदतीचा’उपक्रमातंर्गत समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गुरुवारी (१२ जून २०२५) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी चौक येथे सकाळी ११.४५ मिनिटाला हा कार्यक्रम आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाचा गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी केले आहे. यावेळी अतुल भालकर, अण्णा तिळवे, परशुराम चव्हाण, राज मकानदार, दिलीप कांबळे, अशोक साळोखे, रामा देशवंत, राजू लांबोरे, किरण पोतदार आदी उपस्थित होते.