जिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !
schedule11 Jun 25 person by visibility 113 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी मानसिंग कृष्णराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पाटील हे रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी कार्यरत होते. कोल्हापूर जिप बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांची महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. सांगावकर यांना मंगळवारी (१० जून २०२५) कार्यमुक्तीचे आदेश मिळाले. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जिप बांधकाम विभाग कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील यांची नियुक्ती झाली. पाटील हे गुरुवारी (१२ जून) पदभार स्वीकारणार आहेत.