न्यू मॉडेलच्या गौरी चव्हाण, राजवर्धन जगदाळेंची राज्य शालेय शूटिंग स्पर्धेसाठी निवड
schedule02 Dec 24 person by visibility 94 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे व संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्य शालेय शूटिंग स्पर्धेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी कुमारी गौरी चव्हाण व राजवर्धन जगदाळे यांची१९ वर्षातील गटामध्ये राज्यशालेय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे .राजवर्धन हा १० मीटर एअर रायफल प्रकारात व गौरी ही १० मीटर पिस्टल प्रकारात विभागीय स्पर्धेत विजेते आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या दोघांना विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे. सचिवा, प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे. संस्थेचे सीईओ कौस्तुभ मुरलीधर गावडे. यांचे मार्गदर्शन लाभले.