प्रचाराचा संडे, प्रभाग सातमधील महायुतीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule11 Jan 26 person by visibility 28 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महायुतीच्या विजयाच्या घोषणा, उमेदवारांच्या छायाचित्रांचे फलक, विकास योजनेची घोषवाक्य आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा वातावरणात रविवारी (११ जानेवारी २०२६) प्रभाग क्रमांक सातमध्ये महायुतीच्या उमेदवारांची प्रचारफेरी निघाली. या प्रचारफेरीत मतदारांचा सहभाग मोठा होता. महिला मतदारांनी प्रचारफेरीत सहभाग नोंदविला. महाद्वार चौक, ताराबाई रोड, वांगी बोळ, बिनखांबी गणेश मंदिर, अर्ध शिवाजी पुतळा चौक, शिवाजी पेठ अशा विविध भागातून प्रचारफेरी निघाली.
प्रभाग क्रमांक सातमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रभागात महायुतीचे उमेदवार ऋतुराज क्षीरसागर, विशाल शिराळे, दीपा अजित ठाणेकर, मंगल महादेव साळोखे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी प्रचारफेरीचे आयोजन केले होते. करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचारफेरीला सुरुवात झाली. महाद्वार चौक येथून फेरी निघाली. महायुतीचा विजय असो, भाजप-शिवसेना -राष्ट्रवादीचा विजय असो अशा घोषणा देत फेरी मार्गस्थ झाली. भगव्या टोप्या, गळयात मफलर परिधान करुन तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने फेरीत सहभागी झाले.
वाद्यांचा गजर आणि विजयाच्या घोषणा देत रॅली ताराबाई रोडवरुन पुढे गेली. ताराबाई रोड, वांगी बोळातील मतदारांशी संपर्क साधत महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसरात दाखल झाली. महायुतीच्या चारही उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधला. महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांचा वाढता सहभाग हे प्रचारफेरीचे वैशिष्ट्य ठरले. मतदारसंघातील विविध भागातून ही फेरी निघाली. रविवारी सुट्टीच औचित्य साधून उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधला.