प्रभाग विकासासाठी लाख मोलाचा माणूस आपला ! प्रकाशराव नाईकनवरेसाठी सज्ज पुन्हा शिवसेना ! !
schedule12 Jan 26 person by visibility 58 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रभाग विकासासाठी लाख मोलाचा माणूस आपला ! प्रकाशराव नाईकनवरेसाठी सज्ज पुन्हा शिवसेना…’हे प्रचारगीत सध्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये सर्वत्र वाजत आहे. महायुतीचे उमेदवार प्रकाश नाईकनवरे यांच्या प्रचारार्थ तयार केलेल्या या गीतामध्ये कोल्हापूरची वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत. शिवसेनेचे योगदान विषद केले आहे. तसेच प्रभाग आणि कोल्हापूरच्या विकासात नाईकनवरे यांनी राबविलेल्या विविध योजना प्रचारगीताच्या माध्यमातून उलगडल्या आहेत.
कोल्हापूर महापालिकेसाठी पंधरा जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळे प्रचार वेगावला आहे. उमेदवारांनी वैयक्तिक प्रचारावर भर दिला आहे. तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये शिवसेनेकडून प्रकाश नाईकनवरे निवडणूक लढवित आहेत. मतदारांच्या हक्काला धावून जाणारा हा कार्यकर्ता. सगळयांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची वृत्ती. यामुळे त्यांच्या उमेदवारीला प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रचाराच्या धामधुमीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि उमेदवारी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचारगीताचा खुबीने वापर होत आहे. या प्रचारगीतात संपूर्ण प्रभागात नाईकनवरे यांना मिळणारा पाठिंबा, महायुतीच्या उमेदवारांची प्रचारफेरीवर फोकस आहे. तसेच संपूर्ण कोल्हापूर डोळयासमोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या विकास अजेंडा हायलाइट केला आहे.
‘समृद्ध नवे कोल्हापूर करण्यासाठी सज्ज पुन्हा शिवसेना…’याद्वारे कोल्हापूरच्या शाश्वत विकास अधोरेखित केले आहे. करवीनगरीचे मोठेपण व्यक्त करताना ‘करारी बाण्याची, मायाळू मनाची कोल्हापूरनगरी…’असा गौरवोल्लेख आहे. विकासाची ही परंपरा पुढे चालविण्यासाठी, ‘एकजूट होऊन सगळे धनुष्यबाण निवडू या…’अशी साद घातली आहे. महायुती सरकारची विकासाभिमुख कामे मांडली आहेत.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून राबविलेल्या योजनावर प्रकाशझोत टाकला आहे. शिवसेनेचे समाजकारणाचे सूत्र अंगिकारत प्रकाश नाईकनवरे प्रभागासाठी करत असलेल्या कार्याचा उल्लेख आहे. ‘कार्यकर्ता शोभला राखण्या गड कोल्हापूरचा….एकनाथला लाभला हा जनसेवक हक्काचा!’ हा विश्वास मतदारांना वाटत आहे.https://youtu.be/h2Er1BoKFaU?si=F4SILV3zDKUHPDOV