कमला कॉलेजमध्ये बीसीए सीईटीसंबंधी मार्गदर्शन कार्यशाळा
schedule20 Apr 25 person by visibility 104 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बारावी उत्तीर्ण अथवा परीक्षा दिलेल्या तसेच बीसीए सीईटीसाठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थिनीसाठी कमला कॉलेजमध्ये २५ एप्रिल २०२५ रोजी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. बीसीए विभागातर्फ आयोजित ही कार्यशाळा सकाळी दहा वाजता होणार आहे. बीसीए अभ्यासक्रमास एआयसीटीई नवी दिल्ली यांची मान्यता आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी एमएएच, बी-सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. या कार्यशाळेत सीईटी परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम व तयारीचे तंत्र याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी केले आहे.