Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिकमहादेव डावरे यांचे कार्य  शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळेमहिला - बाल कल्याण देणार मशरुम-आटाविरहीत व्हीट ब्रेड तयारचे प्रशिक्षणडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदानगोकुळच्या माजी चेअरमनांची टोलेबाजी ! जुळे भाऊपासून बापापर्यंत उपमा, जिल्ह्यातील नेत्यांचाही चिमटा ! !शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर - सांगलीतील अधिकाऱ्यांचा समावेश श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपबांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला ३८ हजाराच्या लाचप्रकरणी अटकभागीरथी महिला संस्थेतर्फे कोल्हापुरातील बालाजी पार्कमध्ये वैद्यकीय तपासणीगोकुळसाठी ५४३९ ठराव दाखल ! करवीर,  राधानगरी -राधानगरी- कागल-भुदरगडमधून जास्त ठराव ! !

जाहिरात

 

महादेव डावरे यांचे कार्य  शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळे

schedule02 Jul 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :महादेव डावरे यांचे कृतिशील शिक्षक म्हणून केलेले कार्य इतर शिक्षकांना दिशादर्शक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले . ते  विद्यामंदिर शाहूपरी कोल्हापूर या शाळेतील इंग्रजीचे अध्यापक महादेव डावरे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी .बी .कोपार्डेकर होते . तर मान्यवर पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण संचालक महावीर माने , माजी सहाच्यक शिक्षण संचालक व्ही .बी . पायमल संस्थेच्या सचिव सुधा कोपार्डेकर , खाजगी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार हे होते .
यावेळी बोलताना भरत रसाळे म्हणाले, "महादेव डावरे यांनी 38 वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये इंग्रजीचे  अध्यापक म्हणून केलेल्या उतम कार्यामुळे .त्यांचे अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवा , उद्योग , कला, राजकारण व सामाजिक क्षेत्रामध्ये चमकत आहेत . शिक्षकीपेशा व्रत म्हणून जगलेल्या महादेव डावरे यांनी आपल्या स्वयंशिस्तीतून जे धडे  स्वतःच्या कृतीतून दिलेत ते इतर शिक्षकांना दिशादर्शक आहेत ". 
यावेळी माजी शिक्षण संचालक महावीर माने, व्ही बी .पायमल, सुधा कोपार्डेकर, नगरसेवक अभिजीत खतकर, अभय तेंडूलकर, अदिती केळकर,  शिवाजी भोसले ,  शितल हिरेमठ, के .व्ही पाटील यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. महादेव डावरे यांनी मनोगतामध्ये आई-वडिलांचे संस्कार, पत्नीचे सहकार्य, संस्था आणि शिक्षक चळवळतील शिक्षकांचे प्रेम यामुळे चांगल्या उमेदीने काम करू शकलो याचे समाधान वाटते अशी भावना व्यक्त केली .
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस एस . पाटील यांनी केले.  सूत्रसंचालन शिवाजी सोनाळकर यांनी केले. 
. .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes