Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!चचणडडदिल्लीतील सौंदर्य विषयक परिषदेत डॉ. उद्धव पाटील यांचे मार्गदर्शन कोल्हापुरात भाजपातर्फे ज्योती यात्रा उत्साहात, शहरातून मोटरसायकल रॅली

जाहिरात

 

बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला ३८ हजाराच्या लाचप्रकरणी अटक

schedule01 Jul 26 person by visibility 541 categoryगुन्हे

शाहूवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे यांना ३८ हजार रुपयांची लाच स्विकारताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.वनमोरे हे मूळचे कोयना वसाहत कराड येथील आहेत. एक जुलै २०२६ रोजी कारवाई झाली. शाहूवाडी तालुक्यातील कर्नाळवाडी ते सोनारवाडी विरळे हद्दीपर्यंतचे  दोन किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण, खडीकरण व शिराळे वारुन पुलाचे कामाचे बिल मंजूर केले म्हणून वनमोरे यांनी ठेकेदाराकडून ३४ हजार ७०० रुपयांची लाच मागितली होती.यासंबंधी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी खातरजमा करुन सापळा लावला. शाखा अभियंता वनमोरे व ठेकेदारात पुन्हा चर्चा झाली. यावेळी वनमोरे यांनी, शिराळे वारुनच्या पुलाचे काम, कर्नाळवाडी ते सोनारवाडी गावातील कामासाठी  ३८ हजार रुपये घेऊन येण्यास ठेकेदारास सांगितले. पोलिसांनी, बुधवारी वनमोरे यांना लाच घेताना पकडले. त्यांच्या विरोधात शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलिस हेड काँन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने कारवाई केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes