लेट लतीफ ड्रायव्हरच्या एका दिवसाच्या वेतनाला ब्रेक, महापालिका आयुक्त अॅक्शन मोडवर
schedule22 Oct 24 person by visibility 129 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कचरा टिप्पर वाहनामार्फत उचलला जातो. मात्र अनेकदा या गाडया वेळेवर प्रभागात पोहोचत नाहीत. कचरा उठाव होत नाही अशा तक्रारी होत्या. महाापलिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला अचानक भेट दिली. याप्रसंगी कचरा उठाव करणाऱ्या १७ अॅटो टिप्पर पावणेसात वाजताही बाहेर पडल्या नव्हत्या. वाहनचालक वेळेत न आल्यामुळे टिप्पर जाग्यावर होेत्या. यामुळे आयुक्तांनी, लेट लतीफ वाहनचालक अर्थात अॅटो टिप्परवरील ड्रायव्हरांचा एक दिवसाचे वेतन कपातीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी दोन वाहनचालक प्रभागात न जाता हुतात्मा गार्डन येथे रस्त्याकडेला वाहन पार्किंग करुन बसले होते. त्या दोघा ड्रायव्हरांचेही एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आहेत. प्रभागात टिप्पर गाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी प्रशासकांना आल्याने त्यांनी मंगळवारी वर्कशापची फिरती करुन पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहायक आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक यांना तातडीने सकाळी 6.30 वाजता वर्कशॉपमध्ये बोलावून घेऊन टिप्परवरील संबंधीत ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सर्व गाडयांचा वेळोवेळी देखभाल करुन घ्यावा. ॲटो टिप्परवर जे जीपीसी ट्रॅकींग सिस्टिीम आहे त्या सर्व वाहनांच्या मार्गाची तपासणी करा. ज्या तीन गाडया बंद आहेत त्या तातडीने दुरुस्त करुन सुरु करा. ॲटोटिप्परला पहाटे पाच ते सहा यावेळेत डिझेल भरण्याची व्यवस्था करावी. तसेच सर्व गाडयांचे पंक्चर काढण्यासाठी बाहेर जावे लागते. त्याएेवजी नेमलेल्या एजन्सीने वर्कशॉपमध्ये जागेवरच पंक्चर काढा. त्यामुळे गाडयांचा वेळही वाचेल अशा सूचना वर्कशॉप विभागाला दिल्या