कोल्हापूरची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार, खासदार महाडिकांची नव्या विमानसेवेसंबंधी सूचना !
schedule29 Mar 25 person by visibility 113 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना मुंबई-नाशिक, सोलापूर-मुंबई, पुणे ते बेळगाव, औरंगाबाद-इंदूर, नाशिक-जयपूर, पुणे-हुबळी या मार्गावरही नवी विमानसेवा सुरू व्हावी असे सांगितले. तसेच कोल्हापूरहून नागपूर, गोवा, सुरत, शिर्डी या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, त्यातून महाराष्ट्राच्या उद्योग, पर्यटन आणि कृषी विभागाला मोठा फायदा होईल, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत केली.
ते म्हणाले, भारताच्या विमान संरक्षण विधेयकाबाबतच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने हे विधेयक हे महत्वाचे पाऊल असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये भारतात ७४ विमानतळ होते आणि २०९ मार्गांवर विमानसेवा सुरू होती. २०२४ मध्ये भारतातील विमानतळाची संख्या १४९ झाली असून, तब्बल ९०० मार्गांवर विमान प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. २०१४ मध्ये देशातील साडेआठ कोटी नागरिक विमान प्रवास करायचे. हीच संख्या आता १६ कोटी पेक्षा अधिक झाली आहे. सध्या भारतात साडेसात हजारपेक्षा अधिक विमान प्रवासी सेवा देत आहेत. तर लवकरच नवी १ हजार विमाने भारतीय प्रवाशांना सेवा देण्यासाठी येणार आहेत. नवतंत्रज्ञान, जलद आणि सुरक्षित सेवा यामुळे भारतात विमान व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. दरम्यान महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक विस्तारीत करावी.