Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बँकॉकमधील हायरॉक्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अक्षय मानेची दमदार कामगिरीआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्याऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईलकेआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३६ हजार कुटुंबांचे आवास प्लस सर्व्हेक्षण, पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत यादी मंजुरीची कार्यवाहीअधिकारी बदलले, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागेना ! सादरीकरणासाठी रोज नवीन तारीख ! !बीओटीतून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणीस विरोध, जीमच्या खासगीकरणाला ब्रेक !  मुख्यालयातील सुशोभिकरणाचा हिशेब  सदस्यांनी मांडला ! !

जाहिरात

 

बँकॉकमधील हायरॉक्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अक्षय मानेची दमदार कामगिरी

schedule14 Aug 26 person by visibility 43 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरचा युवा खेळाडू अक्षय माने याने थेट बँकॉकमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या हायरॉक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करत कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. 

कोल्हापूरच्या मातीतून घडलेला युवा खेळाडू अक्षय माने याने आपल्या कर्तृत्वाची छाप थेट बँकॉकमध्ये उमटवली आहे.बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत सहभागी होत अक्षयने आपल्या फिटनेस आणि क्रीडा कौशल्याचे दमदार प्रदर्शन केले. जागतिक स्तरावरील या स्पर्धेसाठी प्रचंड शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज असते.या आव्हानात्मक स्पर्धेसाठी अक्षयने कठोर मेहनत घेतली. नियमित प्रशिक्षण, फिटनेसवर विशेष भर आणि स्पर्धेपूर्वीची तयारी यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले.
अक्षयच्या या यशामागे त्याचे मार्गदर्शक आकाश काळे, आर. डी. सर आणि संतोष सर,आकाश कोरगावकर मुबारक सर,पवन माडेकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर आई-वडिलांनी दिलेला पाठिंबा आणि मित्रपरिवाराने दिलेली साथ यामुळे अक्षयचा आत्मविश्वास आणखी वाढला.कोल्हापूरच्या एका युवा खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत सहभागी होत दमदार कामगिरी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes