रोलर हॉकी स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा मुलांच्या संघास कास्यपदक
schedule02 Dec 24 person by visibility 83 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेच्या स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेतर्फे मीनाताई ठाकरे सभागृह पुणे येथे राज्य अजिंक्यपद रोलर हॉकी स्केटिंग स्पर्धा झाली.या स्पर्धेसाठी मान्यता प्राप्त ॲम्युचअर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने सिनियर मुलांचा कोल्हापूर जिल्हा रोलर हॉकी संघाचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून अकरा संघ होते या स्पर्धेत कोल्हापूरच्या सीनियर मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले. त्यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी अभिनंदन केले. स्केटिंग स्पर्धेतील खेळाडू यश कांबळे, ओम अंगज, सुजल पाटील, मयूर कुराडे, नीलवर्धन शिंदे, सागर कीटवाडकर म्हणून याचा सहभाग होता. या सर्वांना आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ.महेश अभिमन्यू कदम. व राष्ट्रीय कोच भास्कर अभिमन्यू कदम यांचे मार्गदर्शन लाभले.