कोल्हापूर-नागपूर विमानसेवा पंधरा मेपासून ! आठवडयातील पाच दिवस विमानाचे उड्डाण !!
schedule26 Apr 25 person by visibility 249 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा पंधरा मे २०२५ पासून सुरू होत आहे. आठवडयातील पाच दिवस विमानाचे होणार उड्डाण आहे. स्टार एअरवेजच्या १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था आहे.’अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. खासदार महाडिक यांचे कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विस्तार यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा केला. धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लॅण्डिंग, आधुनिक अग्निशमन वाहन, नवी टर्मिनल बिल्डिंग अशी कामे मार्गी लागली आहेत. विमानतळावरील भौतिक सुविधांसह विविध मार्गावर हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू होत आहे. १५ मे पासून मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवडयातील पाच दिवस, स्टार एअरवेजकडून कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत आहे. नागपूरहून सकाळी दहा वाजता विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरात येईल. दुपारी बारा वाजता कोल्हापूरातून विमान उड्डाण करेल आणि दुपारी दीड वाजता हे विमान नागपूरमध्ये पोचेल. या विमानात बारा बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसने असतील. या नवीन विमानसेवेमुळं कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग, पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.