शाश्वत विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट काम करणार- सुरेंद्र जैन
schedule06 Mar 25 person by visibility 335 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी चौरा संघटनांनी एकत्र येऊन कोल्हापूर फर्स्ट या प्लॅटफॉर्मची स्थापना केली आहे. येत्या रविवारी (9 मार्च 2025) या नव्या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती समन्वयक सुरेंद्र जैन यांनी दिली.
हॉटेल पॅव्हेलियन येथे सकाळी दहा वाजता उद्घाटन समारंभ आहे खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी दहा वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी साऱ्यांनी एकत्र येऊन सरकार दरबारी पाठपुरा करायचा आणि कोल्हापूरचा शाश्वत विकास साधायचा हा मुख्य उद्देश आहे. खंडपीठ, आयटी पार्क, नवीन एमआयडीसीची स्थापना, मेडिकल हब, फौंड्री हब अशा विकास प्रकल्पांना जालना दिले जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्यातून विकास प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी कोल्हापूर फर्स्ट काम करणार आहे असे जैन यांनी सांगितले.
याप्रसंगी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, मोहन कुशिरे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, अॅड. सागर घोरपडे आदी उपस्थित होते.