भाजपा सदस्य नोंदणीस प्रतिसाद
schedule05 Jan 25 person by visibility 46 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सदस्य नोंदणी अभियानास प्रतिसाद मिळत आहे. आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात सदस्य नोंदणीचे आवाहन केले. प्रदेश महिला उपाध्यक्ष शौमिका महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना भाजपा सदस्य होण्याचे आवाहन केले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांनी आज दिवसभरात आपल्या बूथ मधील नागरिकांची नोंदणी करण्यासाठी विविध भागात संपर्क साध्घ्ला. भाजपाचे हे सदस्यता नोंदणी अभियान 15 जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून 8800002024 या नंबर वर मिस कॉल द्वारे भाजपा सदस्य नोंदणी करता येणार आहे.