मुख्याध्यापकपदासंबंधी पुरोगामी शिक्षकची शिक्षणमंत्र्यांच्याकडे महत्वाची मागणी
schedule06 Jan 25 person by visibility 102 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माध्यमिक शाळांप्रमाणे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या प्राथमिक शाळांनाही १०० पटास मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. मुंबई येथे मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या समवेत गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण या विषयवार चर्चासत्र झाले. या दरम्यान पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
सरकारने, २८ ऑगस्ट २०१५ च्या निर्णयान्वये इयत्ता ६ वी ते ८ वी ३ वर्ग असलेल्या उच्च प्राथमिक शाळांना १०० पटास मुख्याध्यापक पदाला मान्यता दिली आहे. मात्र इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत १०० पट असलेल्या शाळांना ७ वर्ग असूनही मुख्याध्यापक पद नाही. ही बाब न्यायसंगत नसून आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक व पुरेसे शिक्षक आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर कोल्हापूर जिल्हा प्रमुख संघटक श्रीकांत टिपुगडे आदींच्या सह्या आहेत.
याप्रसंगी मंत्री भुसे यांनी, सर्व शिक्षक संघटनांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करून प्रलंबित मागण्यांपैकी जास्तीत जास्त मागण्या टप्प्या टप्प्याने सोडवण्यात येतील. आपल्या राज्यातील सर्व शिक्षकांनी आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दती राज्यातील सर्व शाळांत पूर्ण क्षमतेने स्विकारून आपले राज्य शिक्षणामध्ये देशात प्रथमस्थानी आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.