खासदार शाहू छत्रपतींचा मंगळवारी वाढदिवस, न्यू पॅलेस येथे स्विकारणार शुभेच्छा
schedule05 Jan 25 person by visibility 84 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा मंगळवारी (सात जानेवारी २०२५) ७७ वा वाढदिवस आहे. यादिनी शाहू महाराज हे न्यू पॅलेस येथील सकाळी दहा ते दुपारी दोन आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत शुभेच्छा स्विकारणार आहेत. शाहू महाराज यांच्याविषयी नागरिकांच्या मनी प्रचंड आदराची भावना आहे. विविध क्षेत्राशी ते संबंधित आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राला त्यांनी नेहमीच प्रोत्साहित केले आहे. उद्योन्मुख खेळाडू, कलाकारांना बळ दिले आहे. कोल्हापूरच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक चळवळीत अग्रभागी राहिले. लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत ते निवडून आले. खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधीत्व करताना विविध प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे.