बारा वर्षात मुश्रीफांनी फाईव्ह स्टार एमआयडीसीत एकही उद्योग आणला नाही -समरजितसिंह घाटगे
schedule12 Nov 24 person by visibility 38 categoryराजकीयउद्योगसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे आमदार, बाबीस वर्षे मंत्री आहेत. एवढी वर्षे सत्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक मतदारसंघात उद्योगधंदे आणले नाहीत. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत गेल्या बारा वर्षात एकही मोठा उद्योग त्यांना आणता आला नाही. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कागल तालुक्यातील बाळेघोल येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले," स्वतःच्या स्वार्थासाठी समाजास वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. भय आणि भ्रष्टाचार मुक्त समाज जीवनासाठी मुश्रीफांना पराभूत करणे आवश्यक आहे. शिवाजीराव कांबळे म्हणाले, " ईडीच्या भितीने पालकमंत्री हसन मुश्रीफांनी पुरोगामीत्वाला तिलांजली दिली आहे." संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले. सभेस शिवाजी कांबळे, मनजीत बेनाडीकर,दयानंद पाटील नंद्याळकर, चित्रा गुरव, मोहन मोरे,संजय बरकाळे उपस्थित होते. दिनकर गुरव यांनी आभार मानले.
........................................................
या निवडणुकीत परिवर्तन अटळ
गेल्या पंचवीस वर्षांत होत असलेली दडपशाही,हुकुमशाहीला जनता कंटाळल्याने गावागावात परिवर्तनाचे वारे घोंघावत आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याने या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. मुश्रीफांनी माणसांच्या विचारधारेला तिलांजली दिली. अशा नेतृत्वाला बदलण्याची वेळ आली आहे. पैसे पेरूण तरुणाई व्यसनाधीन केले. पालकमंत्र्यांनी संपत्तीच्या धुंदीत अनेक घरं फोडली. असे प्रतिपादन काँग्रेसचे सागर कोंडेकर यांनी केले.