Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एआय मुळे जग बदलेल , बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे - आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंतशिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेंच्या स्मृतीदिनानिमित्त बालस्केटिंगपटूतर्फे स्मृतीज्योतमंत्र्यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, रविवारच्या कार्यक्रमाचा घेतला आढावा !!शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरणथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायिनी, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मितामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आष्ट्यात ! अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन, नूतन इमारतींचे उद्घाटन! !रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाला सरकारचे पेटंटपवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरूविद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !

जाहिरात

 

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेंच्या स्मृतीदिनानिमित्त बालस्केटिंगपटूतर्फे स्मृतीज्योत

schedule08 Aug 26 person by visibility 23 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीज्योत काढण्यात आली. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्रातर्फे गेली ३९ वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. जुना बुधवार पेठेतील बापूजींच्या निवासस्थानातून बापूजींच्या स्नुषा श्रीमती इंदिरादेवी साळुंखे  आणि श्रीमती शांताबाई अभिमन्यू कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डांगे गल्ली येथे कदम परिवाराच्या वतीने शारदा भोसले. प्रा. महेश्वरी कदम, सुप्रभा कदम यांच्या हस्ते ज्योतीचे पूजन औक्षण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने फिरून ही स्मृती ज्योत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आली. त्या ठिकाणी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी स्मृती ज्योतिस अभिवादन केले. त्यानंतर ही ज्योत समाधी परिसरात नेण्यात आली. त्या ठिकाणी बापूजींच्या समाधीस बालचमूंनी अभिवादन केले. त्या ठिकाणी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल सीबीएससीचे  प्राचार्य असिफ कोतवाल, नम्रता नार्वेकर, प्रज्योत येजरे यांच्या हस्ते ज्योतीची सांगता करण्यात आली. ज्योतीचे संयोजन ॲड.धनश्री कदम, योगिता घोरपडे, अमित भारमल भास्कर कदम यांनी केले. स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश कदम यांनी मार्गदशन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes