Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चंदगड नगरपंचायतसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, आमदार शिवाजी पाटलांच्या उपस्थितीत घोषणाकागलात राजकीय शत्रू बनले मित्र ! नगरपालिकेसाठी हसन मुश्रीफ-समरजितराजे एकत्र ! !काँग्रेस सोडलेल्या माजी नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवणार - आमदार सतेज पाटील अमूलला टक्कर द्यायचे असेल तर गोकुळचे दूध संकलन वाढवा- मंत्री हसन मुश्रीफशिक्षक बँकेच्या मागील संचालकावरील सहा वर्षे अपात्रतेची कारवाई रद्द, जिल्हा उपनिबंधकांचा आदेशमनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपदनगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक ! माजी मंत्री आमदार खासदारांचा समावेशहलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेकालंडनमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, डॉ. संजय पाटील, तेजस पाटलांनी साधला संवाद

जाहिरात

 

कागलात राजकीय शत्रू बनले मित्र ! नगरपालिकेसाठी हसन मुश्रीफ-समरजितराजे एकत्र ! !

schedule17 Nov 25 person by visibility 111 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा राजकीय संघर्ष करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतसिंह  घाटगे हे कागल नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये एकत्र आले आहेत. मंत्री मुश्रीफ व समरजीतसिंह घाटगे यांच्या अनपेक्षित युतीमुळे कागल नगरपालिकेच्या राजकारणाला ही कलाटणी मिळाली. या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तेरा जागा तर समरजीत सिंह घाटगे यांच्या गटाला दहा जागा असा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आहे. नगराध्यक्षपद अडीच - अडीच वर्षासाठी  असून पहिल्यांदा राष्ट्रवादीकडे हे पद राहणार आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू आघाडीला पद अशी विभागणी ठरल्याचे वृत्त आहे.

 याबाबत; मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मुश्रीफ व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये ते भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत. दरम्यान मुश्रीफ यांचे मित्र व माजी आमदार संजय घाटगे यांना या नव्या समीकरणात जागा मिळणार का ? माजी खासदार संजय मंडलिक हे कागलसाठी स्वतंत्र पॅनेल करणार की ? सारे लक्ष मुरगूड नगरपालिकेवर केंद्रीत करणार ? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत.

दरम्यान ष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांच्या पत्नी सविता या उमेदवार आहेत. कागल मधील राजकारण नेहमीचे पक्षापेक्षा गटातटाभोवती फिरते निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये गटाची रेषा टोकाला असा अनुभव आतापर्यंत कायम आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्री व शाहू ग्रुपचे प्रमुख संभाजी घाडगे यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष झाला नगरपालिका निवडणुकीतही त्याचे अत्यंत भावेश मिळणार अशी शक्यता होती मात्र वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आणि हे दोन टोकाचे राजकीय शत्रू नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आले. 

  या युतीबद्दल बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, "राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो. तसेच; माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजय घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ  नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल,  याबाबत मी प्रयत्न करीन. माझ्या व माजी आमदार  संजय घाटगे यांच्यासोबतच्या चर्चेमधून गैरसमज  पण दूर होईल, याची मला खात्री आहे. ही आघाडी कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षसह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे. त्यासाठी आपण सर्वजण जिवाचे रान करू. ’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes