आजारी पत्नीला पाहायला गेला नाही म्हणून पतीला मारहाण
schedule10 Jul 24 person by visibility 568 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या पत्नीला लवकर पाहायला आला नाही म्हणून सासरा, मेव्हणा आणि नातेवाईकांनी पतीला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका हॉस्पिटलमध्ये घडली.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. फिर्यादी असिफ राजेसाब यंकची (वय 25 ,रा. बीडी कॉलनी जवळ सुशीलानंद रेसिडेन्सी) हे व्यापारी असून त्यांची पत्नी ममता हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले होते. असिफ यंकची पत्नीला पाहण्यास हॉस्पिटलमध्ये गेले असता सासरा महंमद युसुफ मकबूल (वय 55 )आणि मेव्हणा सोहेल मोहम्मद युसुफ मणेर (वय 27, पाचवी गल्ली, शाहूपुरी) यांनी असिफ यंकची याला पत्नीस लवकर बघण्यास का आला नाही म्हणून जाब विचारत दोघांसह अन्य नातेवाईकांनी आसिफला बेदम मारहाण केली. त्याच्या उजव्या पायावर एका वस्तूने जोरदार हल्ला केला असल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये असिफने दिली आहे.