गोकुळतर्फे गुणवंतांचा गौरव, संचालकांचा सत्कार !
schedule01 Aug 24 person by visibility 374 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवतांचा सत्कार करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प कार्यालयात कार्यक्रम झाला. महपुराच्या कालावधीत पाण्यात उतरुन दूध पुरवठा सुरळीत करणाऱ्या संचालकांचा सत्कार झाला.
याप्रसंगी कुस्तीपटू रोहिणी खानदेव देवबा (पठ्ठणकोडोली ), यश काशिनाथ कामांना ( पठ्ठणकोडोली), प्रथमेश सूर्यकांत पाटील (बानगे) यांनी थायलंड येथे झालेले आशिया कुस्ती चॅपियानशिप स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सत्कार झाला. प्रविण प्रकाश दिंडे (पिरवाडी ) यांची मुंबई पोलिस येथे निवड व समर्थ गजानन म्हाकवे (पट्टणकोडोली) यांची जॉर्डन येथे झालेल्या रोमन कुस्ती स्पर्थेत यश मिळाल्याबद्दल सतकर झाला.
चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘ ग्रामीण भागातील व्यक्ती आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवत असून जिल्ह्याचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करत आहेत. अशा व्यक्तींना नेहमीच प्रेरणा देण्याचे काम गोकुळने केले आहे. सर्व सत्कारमूर्तींची कामगिरी ही कौतुकास्पद आहे.”
याप्रसंगी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.
........................
संचालकांचा सत्कार
गेल्या आठवडयात पूरस्थितीमुळे सर्व रस्ते बंद झाल्यामुळे काही मार्गावरील दूध वाहतूक बंद झाली होती. दूध उत्पादकांचे नुकसान होऊन नये म्हणून स्वतः पुराच्या पाण्यात उतरून दूध वाहतूक सुरळीत करून संकलित झालेले सर्व दूध पर्यायी मार्गाने चिलिंग सेंटर वर व गोकुळ प्रकल्पाकडे पोहोच केलेबद्दल संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक किसन चौगले, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, संकलन अधिकारी शरद तुरंबेकर, दत्तात्रय वागरे यांचा तसेच संचालक अजित नरके यांचा सत्कार करण्यात आला.