सिनेट सदस्यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने
schedule20 Dec 25 person by visibility 17 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेले अनेक महिने शिवाजी विद्यापीठाला पूर्ण वेळ कुलगुरू मिळालेला नाही. ही शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच अशी घटना आहे. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळत आहे त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही प्रशासन राजकारण करण्यात व्यस्त आहे. दोन अधिसभांमधील अंतर आठ महिन्यांपेक्षा असू नये अशी तरतूद असताना तब्बल साडेनऊ महिन्यानंतर आधीसभा होत आहे. ही अधिसभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असा आरोप करत शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. विद्यापीठाला दैदिप्यमान इतिहास आहे आणि या इतिहासालाच आज नख लावण्याचा प्रयत्न प्रशासन आणि त्यातील प्रमुख अधिकारी करत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत. विद्यापीठाचा कारभार हा विद्यार्थी केंद्रितच असला पाहिजे शैक्षणिक गुणवत्ता राखलीच पाहिजे आणि विद्यापीठांमध्ये राजकीय अड्डे बंद झाले पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी असल्याचे सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी सांगितले. या आंदोलनात सिनेट सदस्य अॅड. अजित पाटील, स्वागत परुळेकर, यांचा समावेश होता.