Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घघ ततमुरगूडमध्ये मंडलिकच, कागल मुश्रीफ-समरजितचे, पन्हाळयाचा गड कोरेंचा, जयसिंगपुरात यड्रावकरच ! गडहिंग्लजमध्ये कोरे पराभूत, शिरोळमध्ये अशोक मानेंना झटका ! !शिवसेनेकडे उमेदवारांची तगडी फौज ! राष्ट्रवादीतही वाजतगाजत मुलाखती ! !भाषणबाजीत हरवला सिनेटमधील प्रश्नोत्तराचा तास ! मूळ विषयापेक्षा अवांतर चर्चा जास्त ! !सिनेट सदस्यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनेमहायुतीचा फॉर्म्युला ठरला ? २९ डिंसेबरपर्यंत उमेदवारांची घोषणा ! निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारीसरोज पाटील यांना रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार, २५ डिसेंबरला गडहिंग्लज येथे वितरणराष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीशिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी !अक्षय जहागिरदारला राष्ट्रपती सुवर्णपदक, आर्या देसाईला कुलपती सुवर्णपदक ! !

जाहिरात

 

मुरगूडमध्ये मंडलिकच, कागल मुश्रीफ-समरजितचे, पन्हाळयाचा गड कोरेंचा, जयसिंगपुरात यड्रावकरच ! गडहिंग्लजमध्ये कोरे पराभूत, शिरोळमध्ये अशोक मानेंना झटका ! !

schedule21 Dec 25 person by visibility 399 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी नेतेमंडळींना आपआपले गड राखण्यात यश मिळाले काही ठिकाणी आघाडयांचे राजकारण तर काही ठिकाणी पक्षीय पातळीवर निवडणूक लढविली होती. पक्षीय पातळीवर नजर टाकली तर शिवसेना, भाजप आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला कागल, आणि गडहिंग्लजमध्ये यश मिळाले. शिरोळ, कुरुंदवाडला स्थानिक आघाडया भारी ठरल्या. शिरोळमध्ये विजयी यादव आघाडीत काँग्रेस, स्वाभिमानी एकत्र होते.  

गडहिंग्लजमध्ये स्वाती कोरे यांच्या सत्तेला हादरे बसले. याठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने उलटफेर केला. या ठिकाणी नगराध्यक्षदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महेश तुरबतमठ विजयी झाले. अजित पवार पक्षाला १७ जागा तर जनता दल, भाजप, शिवसेना व जनसुराज्य शक्तीला पाच जागा मिळाल्या. आमदार अशोकराव माने यांना शिरोळ नगरपालिकेत झटका बसला. आमदार माने यांच्या स्नुषा व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने या पराभूत झाल्या. तसेच आमदारपुत्र व नगरसेवकपदाचे उमेदवार अरविंद माने यांनाही पराभवाचा झटका बसला. याठिकाणी संयुक्त शिवशाहू यादव गटाच्या योगिता सतीश कांबळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. शिरोळ नगरपालिकेत यादव गटाचे पंधरा नगरसेवक निवडून आले, भै्यया गटाचे दोन तर अपक्ष दोन नगरसेवक विजयी झाले. शिरोळ नगरपालिकेवर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांनी संयुक्त शिवशाहू यादव पॅनेल तयार केले होते. कुरुंदवाड येथे शाहू आघाडीच्या उमेदवार मनिषा डांगे यांची नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.

जयसिंगपूर येथील प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने बाजी मारली. नगराध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर निवडून आले. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ व शाहू  ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने नगरपालिका जिंकली. कागल नगरपालिकेच्या २३ पैकी २३ जागा जिंकत विरोधी शिवसेना अर्थात मंडलिक गटाचा धुव्वा उडविला. कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्षदी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सविता प्रताप माने विजयी झाल्या.

आजरा येथील नगराध्यक्षपदी अशोक चराटी विजयी झाले. याठिकाणी भाजप, ताराराणी आघाडी एकत्र  होती. ताराराणी आघाडीचे आठ तर महाविकास आघाडीचे सहा नगरसेवक निवडून आले. अन्याय निवारण आघाडीचे दोन तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला.

 मुरगूड येथे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने ताकत सिद्ध केली. या ठिकाणी मंडलिक व प्रविणसिंह पाटील एकत्र होते. शिवसेना व भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुहासिनी प्रविणसिंह पाटील विजयी झाल्या. तसेच भाजप व शिवसेनेचे नगरसेवकपदाचे सोळा उमेदवार जिंकले. मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे आघाडीला चार जागा मिळाल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाने पन्हाळयाचा गड कायम राखला. नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य व मित्रपक्षांच नगराध्यक्षपदासह सोळा उमेदवार विजयी झाले. चार अपक्ष नगरसेवक निवडून येत ताकत दाखविली. जनसुराज्यशक्ती पक्षाच्या जयश्री पोवार या नगराध्यक्षपदी निवडून आल्या 

चंदगड येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव पाटील व दोन्ही काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आमदार पाटील यांच्या विरोधात माजी आमदार राजेश पाटील व नंदिनी बाभूळकर या एकत्र लढल्या. या लढतीत भाजपने बाजी मारली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी झाली. नगरसेवकपदाच्या लढतीत भाजपने आठ जागा जिंकल्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीने आठ जागावर विजय मिळवला. एक अपक्ष निवडून आला. आमदार शिवाजीराव पाटील यांनी पुन्हा एकदा  विजय साधला. 

हुपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे मंगलराव माळगे विजयी झाले माळगे हे आरपीआय आठवले गटाचे आहेत. त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढविली होती.  हुपरी येथे नगरसेवक पदाच्या १८ जागा भाजपाने जिंकत निवडणुकीत एकहाती विजय मिळवला. महाराष्ट्र नवननिर्माण सेनेचे दोन उमेदवार विजयी झाले. पेठवडगाव नगरपालिका निवडणुकीत यादव आघाडी विजयी ठरली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या पोळ या २२६३ मतांनी जिंकल्या. या पालिकेत यादव आघाडीचे पंधरा उमेदवार निवडून आले. तर जनसुराज्य शक्ती पक्ष व सालपे गटाचे पाच उमेदवार जिंकले. मलकापूर नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रश्मी शंतनु कोठावळे विजयी झाल्या. हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजितसिंह पाटील विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाचे सहा, काँग्रेसचे पाच, अपक्ष तीन, शिवसेना ठाकरे पक्ष एक आणि भाजपाचे दोन नगरसेवक निवडून आले.

………………

कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन नगराध्यक्ष कागल - सविता प्रताप माने (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राजर्षी शाहू आघाडी), मुरगूड - सुहासिनी प्रविणसिंह पाटील (शिवसेना, भाजप ), चंदगड - सुनील कावणेकर (भाजप), जयसिंगपूर - राजेंद्र पाटील यड्रावकर (राजर्षी शाहू विकास आघाडी), गडहिंग्लज - महेश तुरबतमठ (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष), हातकणंगले – अजितसिंह पाटील (शिवसेना ), कुरुंदवाड - मनिषा डांगे (राजर्षी शाहू आघाडी ), पेठवडगाव - विद्या पोळ ( यादव आघाडी), पन्हाळा – जयश्री पोवार (जनसुराज्य शक्ती पक्ष, मित्र पक्ष), शिरोळ – योगिता कांबळे (संयुक्त शिवशाहू यादव गट, काँग्रेस, स्वाभिमानी आघाडी), मलकापूर - रश्मी शंतनु कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप), हुपरी - मंगलराव माळगे (भाजप), आजरा - अशोक चराटी (ताराराणी आघाडी, भाजप).

……………..

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes