Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडीठठ ददरंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपणशाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूरच्या चित्रकारांच्या कलाकृतीचे मुंबईत प्रदर्शन

schedule22 Dec 25 person by visibility 498 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील चित्रकार प्रवीण वाघमारे, धीरज हाडोळे, स्वप्नील सांगोले यांच्या चित्राकृतींचे 'चित्तदर्शनी' प्रदर्शन २३ ते २९ डिसेंबर २०२५  या कालावधीत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, ऑडिटोरियम हॉल येथे होत आहे. 'चित्तदर्शनी' हा अनुभव पाहणाऱ्याला गती, स्थैर्य, अंतर्मुख प्रवाह आणि अनुभूतीवर भर देतो. या प्रदर्शनात तीन समकालीन कलाकारांची दृष्टी समोर येते, ज्यांच्या कलाकृती थांबून पाहायला आणि अनुभवायला भाग पाडतातदळवीज आर्ट इन्स्टिट्यूट कोल्हापूरचे प्रा प्रवीण वाघमारे यांच्यासाठी चित्रनिर्मिती ही आत घडणाऱ्या जाणिवांचा शांत आविष्कार आहे. रोजच्या जीवनातील साधी दृश्ये, निसर्गातील क्षण आणि समाजातील हालचाली त्यांच्या मनात एक सूक्ष्म तरंग निर्माण करतात. हाच तरंग हळूच रेषा, रंग आणि पोत यांचा आधार घेत कॅनव्हासवर उतरतो. अमूर्त वाटणारी ही चित्रे प्रत्यक्षात वास्तवाशी घट्ट जोडलेली आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes