राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 67 जणांनी मागितली उमेदवारी, 39 इच्छुकांच्या मुलाखती
schedule21 Dec 25 person by visibility 111 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षातर्फे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. पक्षाकडे 67 इच्छुकानी उमेदवारी मागितली आहे. त्यापैकी 39 जणांच्या मुलाखती झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महाविकास आघाडी अंतर्गत निवडणूक लढविणार आहे राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाकडे 21 जागांचा प्रस्ताव सादर केला आहे. रविवारी 21 डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडली.मुलाखती झालेल्या उमेदवारांची यादी ही प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडे देखील यादी पाठवण्यात येईल. येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटकांची एकत्रित बैठक होईल त्या बैठकीमध्ये अंतिम चर्चा होईल.
दरम्यान रविवारी मुलाखत दिलेल्या इच्छुकांमध्ये प्रा. डॉ. लक्ष्मण करपे, प्रशांत पाटील, लता अरुण जोंधळे, मकरंद जोंधळे, राजवर्धन यादव, सोहेल बागवान
शिवानी बाजीराव खाडे, सुरेखा रामराजे बदाले, रामराजे बदाले, धनश्री गणेश जाधव, गणेश जाधव, रियाज कागदी, हिदायत मणेर, फिरोज सरगूर, सादिक अत्तार, माजी नगरसेविका पद्मजा तिवले, चंद्रकांत सूर्यवंशी, सोनू चौगुले, किसन कल्याणकर, माजी नगरसेवक रमेश पोवार, निलोफर बागवान, अकबर महात, हिदायत मणेर, दिशा निरंजन कदम, वहिदा साजिद खान, सायरा आयुब नंदीकुरळे, ॲड. अनिल घाटगे, गणेश नलवडे, सारिका अवधूत पाटील, नागेश नारायण जाधव, मृणालिनी गणेश जाधव, बबलू दयावान चौगुले, रंजीता नारायण चौगुले, निरंजन कदम, तुषार महादेव गुरव, दिनकर लक्ष्मण कांबळे डॉ.रूपाली अमोल बावडेकर, प्रा. हर्षल हरिदास धायगुडे यांनी मुलाखती दिल्या.