कोल्हापुरातील प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
schedule25 Nov 24 person by visibility 326 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक पोवार, खजानिस रमेश मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पोवार यांनी, चव्हाण यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य याविषयी सांगितले. कार्यक्रमाला राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, विलासराव मुळे, अमृत शिंदे, सुरेश कदम, महादेव पाटील, फिरोज खान, पृथ्वीराज कटके, विजयमाला सूर्यवंशी, प्रकाश खराडे, शीला काळे, संगीता खाबाडे. जैनतबी नायकवडी, सविता कांबळे, अनिता सूर्यवंशी, किरण लोकरे आदी उपस्थित होते.