जागतिक महिला दिनानिमित्त कुंभोजमध्ये गोकुळ शॉपीचे उद्घाटन
schedule08 Mar 25 person by visibility 356 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे गोकुळ शॉपीचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
या शॉपीमध्ये दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला, पिस्ता, चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील.
चेअरमन डोंगळे म्हणाले, महिलांनी विविध गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वत: स्वावलंबी बनणे हि काळाची गरज आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुंभोज येथील पूजा पोवार या उच्चशिक्षित तरुणीने व्यवसाय म्हणून ‘मातोश्री गोकुळ दुग्धालय’ उभे केले असून हे निश्चितच कौतुकास्पद आहे. याप्रसंगी मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, प्रतिक मुळीक उपस्थित होते.