बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड अशोकराव पाटील यांचे निधन
schedule29 Jul 24 person by visibility 473 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा सहकार बार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड अशोकराव हिंदुराव पाटील (रा. बेलवळे ता. कागल) यांचे निधन झाले. पाटील यांचे शिक्षण न्यू कॉलेज तर कायद्याचे शिक्षण शहाजी लॉ कॉलेज येथे झाले. 1985 ला लाॅ ची परीक्षा पास झाले व त्याच वर्षी वकील सनद घेऊन कै रामराव इंगळे यांच्याकडे ज्युनिअर म्हणून वकिली व्यवसाय सुरू केला. सहकारमध्ये विशेष खटल्यामध्ये प्राविण्य मिळवले. त्यांनी कोल्हापूर - सिंधुदुर्ग सहकार बार ची स्थापन केली तसेच त्या बारचे ते पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर ते कोल्हापूर जिल्हा बार चे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांनी सहकार व दिवाणी कोर्टामध्ये गेली पस्तीस वर्षे वकिली केलेली आहे. तसेच पुणे कमिशनर व इतर खटलेही चांगल्या प्रकारे चालवलेले होते. आजरा, चंदगड व करवीर तालुक्यातील महत्त्वाचे खटले त्यांनी चालवले आहेत. विशेषतः निवडणुकीचे खटले चालवलेले आहेत.