चित्रपट महामंडळातर्फे खरी कॉर्नरला कॅमेरा मानस्तंभाचे पूजन
schedule02 Dec 24 person by visibility 98 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फ १०४ वा कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन साजरा झाला. खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन करण्यात आले. चित्रकर्मी शाम काणे, महादेव कल्याणकर यांच्या हस्ते कलामहर्षी बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. श्रीमती विजयमाला पेंटर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या हस्ते कॅमेरा मानस्तंभाचे पूजन झाले.एक डिसेंबर १९१९ रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना झाली होती. कलामहर्षी बाबूराव पेंटर व आनंद पेंटर यांनी या संस्थेची स्थापना केली. हा दिवस कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन म्हणून साजरा होतो.
रविवारी, एक डिसेंबर रोजी झालेल्या १०४ व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला सतीश बीडकर, इम्पियाज बारगिर, मिलिंद अष्टेकर, विजय शिंदे, बाबा पार्टे, आकाराम पाटील, रवी गावडे, महेश पन्हाळकर, सदानंद सुर्यवशी, सुभाष गुंदेशा, राजू पाटील, महेश पोवार, बाळकृष्ण बारामती, संग्राम भालकर, अशोक माने, अमर मठपती, सतेज स्वामी, मधुकर वाघे, शोभा शिराळकर, हेमसुवर्णा मिरजकर, बबिता काकडे, नीलम जाधव, वनिता दीक्षित, कल्पना बडकस, मीना निल्ले, उमेश बुधले, प्रताप जाधव, महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर, नम्रता आरडे आदी उपस्थित होते.