Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्मॅक चेअरमनपदी राजू पाटील, व्हाइस चेअरमनपदी भरत जाधव ! सुवर्ण महोत्सवी समिती अध्यक्षपदी सुरेंद्र जैन !!कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त अभियान- बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर  गोकुळमध्ये सहकार सप्ताह, चेअरमन अरुण डोंगळेंच्या हस्ते ध्वजारोहणकोल्हापुरात मोठया नेत्यांच्या सभा ! प्रियांका गांधी शनिवारी, योगी आदित्यनाथ रविवारी दौऱ्यावर ! !ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊ या : खासदार शाहू महाराजराज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत वालावलकर हायस्कूलला रौप्यपदकचित्रकार एस निंबाळकर यांचे निधन राजेश लाटकरांच्या प्रचारार्थ शहरात भगवी रॅलीदत्तक घेतलेल्या वळीवडे गावाकडेही ऋतुराज पाटलांचे दुर्लक्ष: अमल महाडिकमहिलांचा सन्मान राखणाऱ्या ऋतुराज पाटील यांना विजयी करा- मधुरिमाराजे छत्रपती

आयुष्यातील प्रत्येक क्षण कोल्हापूरच्या जनतेसाठी - राजू लाटकर

schedule12 Nov 24 person by visibility 60 categoryराजकीयजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी असेल, जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून कामात कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले. लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते.       राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, सरचिटणीस आरती सिंग, आर.के.पोवार, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, संदीप देसाई, सरला पाटील, भारती पवार, संध्या घोटणे, प्रवीण इंदुलकर, विशाल देवकुळे, दिनेश परमार, दिलीप शेटे, भारती पोवार, महेश उत्तुरे, दत्ता टिपुगडे, कॉ. चंद्रकांत यादव, पूजा नाईकनवरे हे प्रमुख उपस्थित होते.                                          नियोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या विरोधी उमेदवारांच्या कारभाराने कोल्हापूरची दुर्दशा करून ठेवली आहे. रस्ते सुस्थितीत नाहीत, पाण्याचे असमान वितरण होत आहे, कचऱ्याचे ढीग वाढले आहेत. केवळ खंडणी व कमिशन हेच धोरण असलेल्या आमच्या विरोधकाने शहर भकास करून स्वतःचा विकास केला. दहशतीचे हे वातावरण संपवण्यासाठी प्रेशर कुकर या माझ्या चिन्हापुढील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन लाटकर यांनी यावेळी केले. महाविकास आघाडी सरकार महिलांना प्रतिमाह तीन हजार रुपये देणार आणि ते सुद्धा सन्मानाने देणार अशी घोषणा राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी केली. सरला पाटील म्हणाल्या, काँग्रेसने श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना अशा कित्येक योजना आणल्या पण त्याचा कधीही बॅनर, जाहिराती देऊन गाजावाजा केला नाही. महिला कोणत्या पक्षाच्या आहे हे न पाहता सर्वाना त्याचा लाभ दिला. माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, राजेश लाटकर यांना विजयी करून सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र चे स्वप्न साकार करूया. या सभेत सुनील मोदी, रविकिरण इंगवले, संदीप देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. यासभेसाठी राजारामपुरी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes