Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योजक नितीन मेनन यांचे निधनगारगोटीत विशेष नेत्र रुग्णालयाचे रविवारी लोकार्पण; अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ डॉ. रईसा मुल्ला यांना पीएचडीअध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठकट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यूशाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदनविकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोलराष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस  विविध कार्यक्रमडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशनरिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

जाहिरात

 

उद्योजक नितीन मेनन यांचे निधन

schedule21 Nov 26 person by visibility 81 category

महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व नामवंत उद्योजक तसेच मेनन बेअरिंग्ज लिमिटेडचे चेअरमन  नितीन राम मेनन यांचे वयाच्या 59 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या उद्योगविश्वातील एक दूरदृष्टीचे, कर्तृत्ववान आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

 मेनन यांनी मेनन बेअरिंग्ज लिमिटेडच्या प्रगतीत आणि विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे वडील संस्थापक राम मेनन यांनी घालून दिलेला औद्योगिक वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांनी कंपनीच्या आधुनिकीकरणावर, अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानावर आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन प्रक्रियेवर विशेष भर दिला. मिश्रधातूंच्या निर्मितीपासून ते बेअरिंग्जच्या अंतिम मशिनिंगपर्यंत उत्पादनाच्या विविध टप्प्यांमध्ये स्वयंपूर्णता साधण्याच्या दिशेने त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

नितीन मेनन यांच्या नेतृत्वाखाली मेनन बेअरिंग्जने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल उद्योगात विश्वासार्ह उत्पादन भागीदार म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि अचूक अभियांत्रिकीच्या माध्यमातून कंपनीला नवनव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होता.

औद्योगिक क्षेत्राबरोबरच कोल्हापूरच्या पर्यटन आणि जीवनशैली क्षेत्राच्या विकासातही त्यांचे उल्लेखनीय योगदान होते. कोल्हापूरच्या लौकिकात भर घालणाऱ्या प्रतिष्ठित ‘हायलँड क्लब’ची स्थापना आणि विकास त्यांनी केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरला आधुनिक जीवनशैली, आदरातिथ्य आणि पर्यटनाच्या नकाशावर एक नवी ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या पश्चात आई राधामणी मेनन, पत्नी सुचेता मेनन, पुत्र आदित्य व अंशुल, बंधू सचिन मेनन, चुलत बंधू विजय मेनन तसेच आप्तेष्ट असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या लक्ष्मीनारायण नगर, कदमवाडी, कोल्हापूर येथील निवासस्थानापासून निघणार असून, कसबा बावडा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes