Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ग ढडडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशनरिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेमंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोलकोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम! नव्या निवडीत महापौरपदी मूळ ओबीसींना संधी  ! की दाखले काढणाऱ्यांची चलती ?काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मागणीआरोग्य, बांधकामचे मुख्य अधिकारी रजेवर ! अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार!!फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी मेघराज राजेभोसलेगोकुळतर्फे दूध खरेदी -विक्री दरात वाढ, २१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

जाहिरात

 

रिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

schedule20 Nov 26 person by visibility 12 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: ‘बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाइक टॅक्सी अॅपवर कायमस्वरुपी बंदी घालावी. एटीएस मशिनद्वारे केल्या जाणाऱ्या पासिंगमधून रिक्षाला सूट द्यावी. ई रिक्षांना परमीट बंधनकारक करावे.’या मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सर्व रिक्षा संघटनांनी येत्या रविवारी, (२२ नोव्हेंबर) रात्री ११. ५५ मिनिटांपासून सोमवारी, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. सोमवारी, दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. रिक्षा व्यावसायिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. सरकारने या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे. रिक्षा व्यावसायिकांना अडचणीत आणणारी धोरणे  राबवू नयेत. सरकारने सध्याच्या धोरणात बदल न केल्यास आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटना प्रतिनिधींनी दिला. पत्रकार परिषदेला रिक्षा संघटनेचे चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, अविनाश दिंडे, राहुल पोवार, मनसेच राजू जाधव, ईश्वर चन्नी, जाफर मुजावर, रमेश पोवार, अतुल पोवार, राजू जमादार, अरुण घोरपडे, राजेंद्र थोरवडे, राकेश गायकवाड, सुभाष शेटे, नरेंद्र पाटील, तानाजी भोसले, महेश म्हस्के, आनंदराव जाधव आदीं उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes