गारगोटीत विशेष नेत्र रुग्णालयाचे रविवारी लोकार्पण; अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ
schedule21 Nov 26 person by visibility 13 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन : भुदरगड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेत मोलाची भर घालणारे दोन महत्त्वाचे उपक्रम रविवार (२२ नोव्हेंबर २०२६ ) साकार होत आहेत. गारगोटी येथील शासकीय नेत्र रुग्णालयाचा लोकार्पण समारंभ आणि अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ सकाळी १०.०० वाजता उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने सुरू होणारे हे रुग्णालय ३० बेडचे असून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. येथे खालील विशेष सेवा उपलब्ध होणार आहेत. मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, डोळ्याला स्पर्श न करता अत्याधुनिक IOL मास्टरद्वारे लेन्सचा नंबर मोजणे.ऑपरेशननंतर येणारी जाळी काढण्यासाठी यॅग लेझर उपचार, चष्म्याचा अचूक नंबर तपासणी, लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांची तपासणी व उपचार. काचबिंदू तपासणी व उपचार.काचबिंदूसाठी आवश्यक पेरिमेट्री चाचणी,ओसीटी (OCT) स्कॅन (रेटिना / डोळ्याच्या मागील पडद्याचे स्कॅन, डोळ्यांचा दाब तपासणी होणार आहे.
हृदयविकारावरील उपचारांसाठी अद्ययावत कॅथलॅब उभारण्यासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याच्या कामाचा शुभारंभही याच कार्यक्रमात होणार आहे. या कॅथलॅबमध्ये १० आयसीयू बेड, सर्व इक्विपमेंटसह मॉड्युलर ऑपरेशन थिएटर. अँजिओग्राफी (रक्तवाहिन्यांची तपासणी / एक्स-रे चित्रण).अँजिओप्लास्टी (अरुंद झालेली रक्तवाहिनी रुंद करण्याची प्रक्रिया) होणार आहे.