एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; कोल्हापुरात शिवसेना कार्यकर्त्यांचे गणरायाला साकडे
schedule27 Nov 24 person by visibility 368 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेले काम याचाच फायदा महायुतीला झालेला दिसून येत असून, जनतेच्या हिताचे, कल्याणाचे निर्णय घेणारे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी कोल्हापुरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गणरायाला साकडे घातले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यांच्या योग्य नियोजनाने कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले. आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिमंडळात उत्तम प्रकारचे मंत्रीपद मिळावे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ही व्हावेत यासाठी कोल्हापुरातील सिद्धिविनायक गणपतीला कार्यकर्त्यांनी साकडे घातले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमित साटम, संग्राम बावडेकर, प्रशांत नलवडे, विशाल पाटील,अक्षय घाटगे, कैलास मेढे, यश लोहार,व सर्व शाहूपुरी भागातील तरुण उपस्थित होते