मोठी स्वप्ने बाळगा, आपली स्वाक्षरी ऑटोग्राफ बनेल इतके यश मिळवा
schedule18 Mar 25 person by visibility 161 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असली तरी शिक्षण संपलेले नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोनाने वाटचाल करा. मोठी स्वप्ने बाळगा आणि ती परिश्रमपूर्वक पूर्ण करा. आपली स्वाक्षरी ही 'ऑटोग्राफ' बनेल इतके यश मिळवा असे आवाहन इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ग्लोबल नेटवर्क फॉर मेडिकल हेल्थ प्रोफेशन्स अँड बायोथिक्स एज्युकेशनचे महासचिव आणि डॉ. बी. सी. रॉय अवार्डने सन्मानित डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी 690 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले.
डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या आवारात शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, युजीसी प्रतिनिधी डॉ. उमराणी, माजी कुलगुरू डॉ. शिरीष पाटील उपस्थित होते.
यावेळी १९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. डॉ. रणजीत निकम या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. तर डॉ. सागर गोयल यास ‘बेस्ट आउट गोइंग स्टुडंट’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी १७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
कुलगरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. उमाराणी जे., प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, प्राचार्य अमृतकुंवर रायजादे, प्राचार्य रुधिर बारदेस्कर, डॉ आर. एस. पाटील, प्रा. डॉ. अजित पाटील, वैदयकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपप्राचार्य डॉ. आशालता पाटील, उप कुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव तेजशील इंगळे उपस्थित होते. डॉ. देवव्रत हर्षे, डॉ.अमित बुरांडे, प्रा. रेणुका तुरंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे....प्रभाकरन उन्नती एमबीबीएस), श्वेता पाटील (बी.एस्सी नर्सिंग), श्रद्धा ताईगडे (पी.बी. बी.एस्सी नर्सिंग), योगेश्वरी (एम.डी.), वत्सल पटेल (एम.एस.), श्रद्धा मुताळ, लीना पिंगुळकर (एम.एस. नर्सिंग), प्रिया वाडकर (एम.एस्सी. स्टेमसेल अँड रिजनरेटीव्ह मेडिसिन), आदिती साळुंखे (बॅचरल ऑफ फिजीओथेरपी) , नम्रता निलकर (मास्टर ऑफ फिजीओथेरपी), साद शेख (बी.एससी हॉस्पिटॅलिटी), सृष्टी तांबडे (बी.एससी एमएलटी) यांना डी. वाय. पाटील पाटील विद्यापीठ सुवर्ण पदकाने तर अक्षय चीन्तोजू (एम.डी-मेडिसिन) यांना रामनाथ विठ्ठल वाघ सुवर्ण पदक, एमबीबीएस तृतीयच्या कौमुदी कुलकर्णी यांना डॉ. पी. बी. जागीरदार एक्सलन्स अवार्डने, अमीर मेस्त्री, आणि स्वाती प्रकाश यांना मालन मधुकर सबनीस स्मृती अवार्डने, मोहित प्रसाद बोनंथे यांना हेमलता रामनाथ वाघ सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. डॉ. सागर गोयल यांचा (एमबीबीएस) यानाचा ‘बेस्ट आउट गोइंग स्टुडंट’ म्हणून तर रणजित निकम (पीएच.डी.) यांचा ‘एक्सलन्स इन रिसर्च’ अवार्डने सन्मान करण्यात आला.
.