डॉ. विदुला मा जोशी यांचे निधन
schedule15 Feb 25 person by visibility 192 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : कोल्हापुरातील ख्यातनाम प्रसुती रोगतज्ज्ञ श्रीमती विदुला माधव जोशी यांचे वार्धक्याने शनिवारी (१५ फेब्रुवारी २०२५) निधन झाले. प्रसूती रोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयात अखंड सेवा दिली. पूर्वाश्रमीचे प्रख्यात कै. डॉ. मा. ना. जोशी यांच्या त्या पत्नी होत. तसेच कोल्हापुरातील प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक माधव जोशी यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. *रक्षाविसर्जन उद्या रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे