नाइट कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. उत्तम पाटील
schedule02 Dec 24 person by visibility 143 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचालित नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूरच्या प्राचार्यपदी डॉ. उत्तम पाटील यांची निवड झाली आहे . त्यांनी नुकताच प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला . यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी प्राचार्य पाटील यांचे स्वागत केले . पाटील हे प्राध्यापक व इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालय रूकडी येथे कार्यरत होते . त्यांना पदवी वर्गांना एकतीस वर्षांचा व पदव्युत्तर वर्गांना सोळा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी सहा ग्रंथांचे लेखन केले असून ते विद्यापीठीय अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासले जातात .
संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम म्हणाले, ' प्राचार्य पाटील यांना संशोधन, अध्यापन, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन यांचा प्रदीर्घ अनुभव आहे .ते एक हाडाचे शिक्षक व उत्कृष्ट प्रशासक आहेत. त्यांच्या प्राचार्यपदाच्या कालावधीत नाइट कॉलेजने स्वायत्त महाविद्यालय म्हणून आपला एक स्वतंत्र ठसा निर्माण करावा ' .
प्राचार्य डॉ उत्तम पाटील म्हणाले की, 'कौन्सिल ऑफ एज्युकेशन व नाइट कॉलेज यांच्या देदिप्यमान शैक्षणिक परंपरेला पुढे नेण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन . देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी ज्या उद्देशाने नाइट कॉलेज सुरू केले त्यांना डोळ्यासमोर ठेवून बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्राधान्य राहील.” दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ प्रसाद मगदूम, संचालक अँड वैभव पेडणेकर, ॲड अमित बाडकर यांनी प्राचार्य डॉ पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य सुरेश फराकटे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते