धन्वंतरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत कोरे, उपाध्यक्षपदी संध्या महाजन
schedule03 Jul 24 person by visibility 378 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांच्या धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत कोरे, उपाध्यक्षपदी संध्या महाजन यांची निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन पदाधिकारी निवडी झाल्या. प्राधिकृत अधिकारी मिलिंद ओतारी अध्यक्षस्थानी होते.
हिवताप कर्मचारी सोसायटीच्या सतीश ढेकळे, उपाध्यक्षपदी भीम बोरगावे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शिवाजीराव भोई, डॉ. मिलिंद कदम, संदीप नाईक, पूजा घाटगे, विश्वनाथ परमणे, महेशकुमार देशमुख, विलास आळवेकर, सुभाष इंदूलकर, पांडूरंग बर्गे, संध्या कांदणे, कुमार कांबळे, मंगल पाटील, शरद देसाई, श्रीकृष्ण बांदिवडेकर, सुनील पाटील, संदीप कुंभार, एकनाथ जोशी, सुनीता गडदे आदी उपस्थित होते.