युवासेनेतर्फे डॉक्टर्स डे साजरा
schedule01 Jul 24 person by visibility 482 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शिवसेना युवासेनेतर्फे शहरातील हॉस्पिटलमध्ये भेट देऊन डॉक्टर्स डेनिमित्त शुभेच्छा देत डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रुग्णसेवेचे व्रत घेऊन अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आणि रुग्णाला पुर्णपणे बर करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात युवासेना शहर मंदार पाटील, पियुष चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र उपविभागीय सोशल मीडिया समन्वयक सौरभ कुलकर्णी, शहरप्रमुख नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, वल्लरी वाले, निवेदिता तोरस्कर, रोहन शिंदे आदी उपस्थित होते.