मोदींच्या दहा वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राला दहा लाख कोटीची विकासकामे-मुरलीधर मोहोळ
schedule11 Nov 24 person by visibility 49 categoryराजकीयसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत महाराष्ट्रासाठी मोठे प्रकल्प मंजूर झाले.केंद्र आणि राज्य सरकारच्य विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ राज्यातील ५० टक्क्याहून अधिक लोकसंख्येला मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कालावधीत महाराष्ट्राला दहा लाख कोटीची विकासकामे मंजूर आहेत, या विकास योजना झपाटयाने होत आहेत असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ‘ यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री मोहोळ हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. राज्याच्या विकासाच्या व कल्याणकारी योजना बंद पाडण्याचे काम महाविकास आघाडीने केले. २०१९ मधील निवडणुकीत जनतेने भाजप, शिवसेनेला कौल दिला होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी जनतेचा जनाधार डावलला. दरम्यान गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत महायुती सरकारने राज्यात विकासाचे मार्ग तयार केले आहेत. मुलींना मोफत उच्च शिक्षण , महिलांना एसटी प्रवासात सवलत, लाडकी बहिण योजना अशा विविध योजना राबविल्या.
मोहोळ यांनी ’‘माझे कोल्हापूरशी जुने नातं आहे. मात्र कोल्हापूरची प्रगती म्हणावी तशी झाली नाही. कोल्हापूर महापालिकेत गेली वीस वर्षे नेतृत्व करणाऱ्यांनी शहराच्या प्रगतीसाठी काय केले. एकहाती सत्ता असूनही त्यांना शहराचा विकास साधता आला नाही. रस्ते, पाणी, कचरा वयवस्थापन, वाहतुकीची सुविधा, पार्किंग या समस्या सुटल्या नाहीत’अशी टीकाही काँग्रेस नेतृत्वावर केली. विकासासाठी महायुती सरकारच्या पाठीशी राहा. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषेदला महायुतीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, भाजपच्या महिला पदाधिकारी शौमिका महाडिक, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते.