Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे पंधरा जूनला लावणी-लोकगीत गायनमहापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश ! कोल्हापूर-इचलकरंजी-सांगलीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती !!मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न –राजेश क्षीरसागरराष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन साजरामहावितरणला ग्राहकांकडून तक्रारींचा झटका ! ऊर्जा दरबारात चुकीच्या कामकाजावर प्रकाशझोत !!कोल्हापूरसह अनेक शहरात होणार महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे ! कृष्णराज महाडिकांचा पुढाकार, वोलू संस्थेची करारमानाचा राजर्षी शाहू पुरस्कार डॉ.जब्बार पटेल यांना जाहीर, 26 जूनला पुरस्कार वितरण समारंभ एआय, रोबोटिक्स अभ्यासक्रमाची सुरुवात करुन  विवेकानंदची शैक्षणिक चळवळीत आघाडी-प्रकाश आबिटकरकोल्हापुरात माळी भवन उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करू –अमल महाडिकबांधकाम व्यासायिक- वास्तुविशारदांचे विकासाचे व्यापक व्हिजन शहराला गतीमान बनवेल-प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

अंगणवाडी कामगारांसाठी सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार

schedule08 Jun 25 person by visibility 83 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भारतीय मजदूर संघ संलग्न भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्यावतीने केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ कार्यालयात झाली. या बैठकीत अंगणवाडी अंगणवाडी कामगारांसाठी सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. संघटन बळकट करण्यासाठी जिल्हानिहाय जनजागृती मोहीम व मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे ठरले.

भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय उपाध्यक्षा श्रीमती अंजली पटेल (ओरिसा ), अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मिष्ठा जोशी  (गुजरात), सरचिटणीस श्रीमती पुष्पा सिंह (झारखंड), अंगणवाडी महासंघाच्या उपाध्यक्षा श्रीमती वनिता सावंत (महाराष्ट्र)  यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय मजदूर संघाचे महामंत्री रविंद्र हिंमते, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल डुमणे, मजदूर संघाचे प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर यांनी मार्गदर्शन केले.  

बैठकीत ‘सरकारी सेवक दर्जा मिळावा" – मानधन नको, किमान वेतन आणि सर्व कर्मचारी हक्क मिळाले पाहिजेत, ग्रॅज्युइटी हक्क– सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युइटीचा लाभ प्रत्येक अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना मिळाला पाहिजे, अंगणवाडी महिलांवरील अत्याचार, मानहानी व मानसिक छळ" – याबाबत शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समित्या तयार कराव्यात.’असे ठराव करण्यात आले.तसेच  मानधन ऐवजी नियमित वेतन व सर्व सेवाविशेष लाभ लागू करण्याची मागणी,  आरोग्य व अपघात विमा, व निवृत्ती लाभ योजना लागू करण्याबाबत ठोस पाठपुरावा संबंधी चर्चा झाली.  भारतीय मजदूर संघाच्या झेंडा खाली एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) श्रीमती वनिता वाडकर, सरचिटणीस, वनिता सावंत, नंदा चव्हाण, स्मिता पानसे, यांनी  केले आहे. 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes