ट्रेडिंग लायसन्स नसणारे क्रशर सील होणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई
schedule27 Jan 25 person by visibility 185 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : विक्रेता परवाना (ट्रेडिंग लायसन्स) नसलेले क्रशर सील करण्यात येणार आहेत. करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी यासंबंधी मंडल अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशाने ही कारवाई होणार आहे. नुकतीच महसूल अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत अधिकाऱ्यांना यासंबंधी स्पष्ट आदेश दिले आहेत. करवीर तालुक्यातील बहुतांश क्रशरधारकाकडे विक्रेता परवाना नसल्याचे समोर आले आहे. 31 जानेवारी 2025 पर्यंत कारवाई करण्याचे आदेश आहेत. गावातील तलाठी व महसूल सेवकांना सोबत घेऊन कारवाई करावी असे म्हटले आहे. मंडल अधिकाऱ्यांना असे आदेश आहेत.