आयुक्तांच्याकडून कारवाईचा बडगा, तीन अधिकारी निलंबित ! सात जणावर दंडात्मक कारवाई !!
schedule15 Feb 25 person by visibility 292 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहरामध्ये साफसफाई करणे, कचरा उठाव करणे, कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळणे, ॲटो टिप्पर नियोजनासाठी उपस्थित न राहिल्याने स्वच्छता विभागाकडील कामकाजामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा केलेने मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अधिक्षक मारुती मधाळे व आरोग्य निरिक्षक आनंदा बावडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य स्वच्छता विभागाकडील शहर समन्वयक हेमंत काशीद व मेघराज चडचणकर यांना रक्कम ५००० रुपये इतका दंड करण्यात आला आहे. तसेच शहरातील सफाई कचऱ्याबाबत खुलासान केल्यामुळे जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांना तीन हजार रुपये दंड केला आहे. त्याचबरोबर वाय पी पोवार नगर ते जवाहरनगर मुख्य रस्ता, शाहू मित्रमंडळ येथील नार्वेकर मार्केटजवळ व माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्तेकडेला कचऱ्याचे ढिग साचल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्य निरिक्षक शर्वरी कांबळे यांना पंधराशे रुपये दंड व मुकादम प्रफुल्ल आयवाळे, सागर बुचडे, संग्राम कांबळे यांना प्रत्येकी ५०० रुपये इतका दंड करण्यात आला आहे. दरम्यान मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांना सेवेतून निलंबित केल्यामुळे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील यांच्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.