Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शनमहिलांनी राजकीय साक्षर बनायला हवे –स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकरअवनितर्फे शुक्रवारी शिक्षण हक्क  परिषदक्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांना अभिवादनन्यू कॉलेजमध्ये साकारला आधुनिक ई कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओडीवाय पाटील कृषी अभियांत्रिकीचा विद्यार्थी बनला कृषी शास्त्रज्ञराष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत केआयटीच्या शाहू मानेला सुवर्णपदकअटलजींनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा अभिमान-आमदार सुधीर गाडगीळशिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठकशनिवारी शाहू स्मारकमध्ये रंगणार मंगलगाणी -दंगलगाणी संगीत मैफिल 

जाहिरात

 

भाजपाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना

schedule30 Nov 24 person by visibility 97 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भारतीय जनता पक्षाकडून आता महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पदाधिकाऱ्यांची बेठक घेऊन निवडणुकीच्य तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. भाजपा जिल्हा कार्यालयात बैठक झाली.  निवडणुकीत सातत्याने कार्यरत असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. 

 बैठकीत भाजपा सदस्य नोंदणीची माहिती दिली.८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉल देऊन तसेच नमो अॅप द्वारे भाजपा सदस्य नोंदणी करता येते.  प्रत्येकाने आपल्या बूथ, मंडल स्तरावर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन सर्वांना केले.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, आगामी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जिद्द, मतदार संघात संपर्क, सातत्य यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागावे.  प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, महापालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी भाजपा कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही. आजपासूनच सर्वांनी प्रभागात जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. 

याप्रसंगी अशोक देसाई, गायत्री राउत, डॉ राजवर्धन, राजू मोरे, शैलेश पाटील, विशाल शिराळकर, विशाल शिराळे, गिरीश साळोखे, सागर रांगोळे, रविंद्र मुतगी, सुनील पाटील, संग्राम जरग, दिलीप रनवरे, दिलीप मेत्राणी, सचिन सुराणा, कोमल देसाई, प्राची कुलकर्णी, लता बर्गे, शारदा पोटे, अश्विनी गोपूगडे, तेजस्विनी पार्टे, सुजाता पाटील, विद्या बनछोडे, रीना पालनकर उपस्थित होते. 

 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes