अरुण नरके फौंडेशनचा उपक्रम, पाच लाखाची स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना
schedule29 Apr 22 person by visibility 995 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणीमुळे जे विद्यार्थीस्पर्धा परीक्षांचे शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा बारावी नंतरच्या सर्व विद्यार्थांसाठी अरुण नरके फाउंडेशनतर्फे पाच लाख रुपयांची शिष्यवृत्तीची ' कै. सुनिता नरके स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना' चालू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले.
अरुण नरके फोंडेशनचे शिक्षक व पदाधिकारी शशिकांत सुतार, प्रकाश शिंदे, रमेश कांबळे, गौरी देशपांडे, किरण कामत, अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. या योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थांची चाचणी परीक्षा एमपीएससी ' संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ' परीक्षेच्या धर्तीवर मे २०२२ मध्ये घेतली जाईल, या चाचणी परीक्षेच्या निकालाच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थांची
शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल, पात्र विद्यार्थांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधून १ वर्षाच्या कालावधीसाठी एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्ससाठी प्रवेश दिला जाईल. या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजनेचा लाभ १२ वी किंवा पदवीचे शिक्षण घेत असलेले सर्व विद्याशाखेचे विद्यार्थी घेऊ शकतात. तसेच या योजनेतील सहभागी
विद्यार्थी संस्थेच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमासाठी ५% शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. ही योजना
मर्यादित कालावधीसाठी असल्याने याचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी नाव नोंदणी करून या स्पर्धापरीक्षा शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. अरुण नरके फौंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या कोल्हापूरात शिवाजी पेठ फोन नं. 0231-2627579, नागाळा पार्क युथ बँकेच्यावर फोन नं. 0231-2668950, सांगली 0233-2332334 व गडहिंग्लज मो. 9175683174 येथे शाखा कार्यरत असून शिष्यवृत्ती योजनेच्या नावनोंदणीसाठी संस्थेशी संपर्क साधावा. / नावनोंदणीसाठी अरुण नरके फौंडेशनच्या 9175683171 या मोबाईल नं संपर्क साधावा.