संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
schedule22 Nov 24 person by visibility 118 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर - येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डे बोर्डिंग विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक खेळाडू विकास घोडके उपस्थित होते. प्रारंभी क्रीडाज्योतीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली.
अग्नी हाऊस, त्रिशूल हाऊस, आकाश हाऊस व पृथ्वी हाऊस या गटांतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. शंभर मीटर, दोनशे मीटर, ४०० मीटर व ८०० मीटर धावणे, ,थाळी फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, रिले, कुस्ती, टेनिस, स्विमिंग, आर्चरी, शुटिंग या वैयक्तिक खेळांसोबतच बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, योगा स्पर्धा, बुद्धिबळ, ज्युडो, कराटे, तायकांदो यासारख्या सांघिक खेळांच्या स्पर्धाही पार पडल्या.
यावेळी पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये५० मीटर धावणे, रस्सीखेच, कोन रेस यासारख्या स्पर्धा झाल्या. त्यामध्ये दिपाली चौगुले, श्रुती आमटे, प्रतीक चौगुले, विनोद खूपचंदानी, बजतराय गांधी, नितीन जाधव, शितल गुजपडे, तृष्णावेणी जंगम, सुमय्या पटेल, अफसाना मकूभाई, संग्राम पाटील, ताहीर मकुभाई, स्नेहा पाटील, नितल छाजेड, तनुश्री पाटील या सर्वांना विविध स्पर्धेत मेडल प्राप्त झाले.
या कार्यक्रमासाठी संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती उपस्थित होत्या. प्राचार्य अस्कर अली, उपप्राचार्य नितीन माळी, उपप्राचार्या अर्चना पाटील, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर आदींनी क्रीण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.