Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पिढया बदलतील, वक्ते-श्रोते नवीन असतील ! तर्कतीर्थांचे तर्क मात्र तेच राहतील !!केंद्रीयमंत्र्यांनी केले गोकुळचे कौतुक ! सहकार मंत्रालयामार्फत सहकार्याची ग्वाही !!पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रिन्स शिवाजी जाधववाडी शाळेचे यशपन्हाळा नगरपरिषदचे सुपर स्वच्छ लीगमध्ये देशपातळीवर यश, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवबिद्री कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी जीवन पाटीलकेआयटीच्या माध्यमातून वर्षभरात ६०० विद्यार्थ्यांना नोकरीची संधीजिल्हा बँकेचे राजकारण वेगळे- गोकुळचे राजकारण वेगळे, संचालक वाढवून दूध उत्पादकांना काय फायदा ?प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चाराहुल रोकडेंची सांगलीला बदली, रविकांत आडसूळ नवे अतिरिक्त आयुक्तसंस्कृती माणसाला सभ्य बनविते, धर्म माणसाला कडवट बनवतो-प्राचार्य सुनीलकुमार लवटे

जाहिरात

 

आनंदराव पाटील यांना भाई माधवराव बागल पुरस्कार

schedule24 May 25 person by visibility 199 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : समन्यायी पाणी हक्क परिषदेचे आनंदराव बहिर्जी पाटील यांना यंदाचा,  भाई माधवराव बागल पुरस्कार जाहीर झाला आहे. भाई माधवराव बागल यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून बुधवारी (२८ मे २०२५) पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह, रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते येथील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळ पाच वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य टी. एस. पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली. यावेळी संभाजीराव जगदाळे, रवी जाधव, जितेंद्र कांबळे, शंकर काटाळे, परशराम माने आदी उपस्थित होते. यंदाचे पुरस्कारार्थी पाटील हे कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील आहेत. त्यांनी समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शी कार्यक्रम राबविला. चिकोत्रा पाणी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. भारती विद्यापीठाचे संस्थापक-कार्याध्यक्ष आहेत. सानेगुरुजी सोबत राष्ट्सेवादलाचे कार्य केले आहे. समाजवादी, साम्यवादी तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. विद्यार्थीदशे महात्मा गांधी  व पंडित नेहरु यांच्यासोबत स्वातंत्र्यचळवळीत काम केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes